ती ऑडिओ क्लिप लागली पोलिसांच्या हाती..  समोर आल्या धक्कादायक गोष्टी..नितीन देसाईंच्या आत्महत्येचे गूढ वाढले. 

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत यांनी एक दिवसापूर्वी आत्महत्या केली आहे. 

नितीन देसाई यांनी लगान,जोधा अकबर,देवदास सारख्या अनेक मोठ्या चित्रपटांसाठी काम केले आहे.

नितीन देसाई यांनी आत्महत्या करताना धनुष्य बाणा ची आकृती काढलेली आहे त्यामुळे गूढ वाढले आहे. 

आर्थिक संकटामुळे त्यांनी हे पाऊल उचलले असण्याची शक्यता निकट वर्तियांकडून वर्तवली जात असली तरी त्यामागे आणखी दुसरे कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत.  

महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करून ठेवल्याची चर्चा आहे. तसेच ती क्लिप पोलिसांकडे जमा केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.